बंगळुरूवरुन आलेल्या इंजिनीअरला ऑटो चालकाने लुटले, 18 किलोमीटर फिरवण्याचे घेतले तब्बल 4400 हजार रुपये


पुणे- येथील एका ऑटो चालकावर बंगळुरूवरुन आलेल्या सॉफ्टवेअर इंजीनिअरकडून 18 किमीसाठी 4400 रुपये घेतल्याचा आरोप आहे. या फसवणुकीमुळे ऑटो चालकविरुद्ध शहरातील येरवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. कामानिमित्त बंगळुरच्या रहिवासी असलेला एक सॉफ्टवेअर इंजीनिअर बुधवारी पुण्याला आला होता. तो सकाळी 5 वाजता कात्रज-देहू रोड बायपास वर सोडले. या ठिकाणावरुन त्याला ज्या ठिकाणी जायचे होते, ते अंतर 18 किलोमीटरचे होते. तेथे जाण्यासाठी इंजीनिअरने एक ऑटो केला. यावेळी रिक्षा चालकाने त्या व्यक्तीडून 4400 रुपये ऑटोचे भाडे घेतले. मीटरमध्ये 3200 रुपये किराया दाखवला पोलिसांनी सांगितले की, 18 किलोमीटरसाठी ऑटोच्या मीटरमध्ये 3200 रुपये किराया दाखवला, तर 600 रुपये शहरात येण्यासाठी आणि 600 रुपये शहरातून बाहेर जाण्यासाठी त्या ऑटो चालकाने घेतले. अशाप्रकारे त्या ऑटो चालकाने त्या व्यक्तीकडून 4400 रुपये घेतले. पोलिसांना त्या इंजीनिअरने सांगितले की, जेव्हा त्याने हे बिल देण्यास नकार दिला, त्यानंतर त्याने असभ्य भाषेत बोलण्यास सुरुवात केली. सध्या पोलिस नंबर प्लेटच्या आधारे त्या ऑटो चालकाचा शोध घेत आहेत.